मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक युनिट, पोलीस टू-व्हीलरचे उद्धघाटन

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक युनिट, पोलीस टू-व्हीलरचे उद्धघाटन

मुंबई, दि. ७ (एम एमसी न्यूज नेटवर्क): मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत सायबर सुरक्षेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत मोबाईल फॉरेन्सिक युनिट व्हॅन, मोबाईल विक्टिम स्पॉट युनिट व्हॅन आणि अत्याधुनिक पोलीस टू-व्हीलरना हिरवा झेंडा दाखवून या यंत्रणांचे उद्घाटन केले.

या नव्या उपक्रमांमुळे गुन्हेगारी घटनास्थळी तात्काळ आणि अचूक तपास करणे शक्य होणार आहे. मोबाईल फॉरेन्सिक युनिटच्या मदतीने घटनास्थळीच प्राथमिक तपास केला जाऊ शकतो, तर मोबाईल विक्टिम स्पॉट युनिट पीडितांना त्वरित मदत पुरवेल. यासोबतच, अत्याधुनिक पोलीस टू-व्हीलर्सचा उपयोग वाहतूक नियंत्रण, गस्त आणि आपत्कालीन परिस्थितींमध्ये जलद प्रतिसादासाठी केला जाणार आहे.

उद्घाटन समारंभप्रसंगी गृहराज्यमंत्री योगेश कदम, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन्द्र भारती तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या नव्या तंत्रज्ञानाने सुसज्ज उपक्रमांमुळे महाराष्ट्र पोलीस दल अधिक सक्षम होईल आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी नवा विश्वास निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *