मुख्यमंत्री आणि बावनकुळे भेट

 मुख्यमंत्री आणि बावनकुळे भेट

नागपूर, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपूर दौऱ्यावर असताना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री आणि बावनकुळे यांच्यात अनेक विषयांवर चर्चा केली. आगामी लोकसभा निवडणूक महायुती म्हणून एकत्रितपणे लढवून विजयी होण्याचा निर्धार यावेळी या दोघांनी व्यक्त केला.

यावेळी बावनकुळे कुटुंबियांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे आदरपूर्वक स्वागत करून त्यांना हनुमानाची मूर्ती भेट म्हणून दिली. मुख्यमंत्र्यांनी याबाबत त्यांचे मनापासून आभार मानले. सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या प्रचारासभामध्ये तर उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या प्रचारसभेत व्यस्त आहेत. आम्ही सर्वजण महायुती म्हणून एकत्र आहोत आणि काहीही करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी बसवणार आहोत अशी प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. यावेळी खासदार कृपाल तुमाने, महायुतीचे उमेदवार राजू पारवे, आमदार आशिष देशमुख, शिवसेनेचे पूर्व विदर्भ समन्वयक किरण पांडव आणि बावनकुळे कुटुंबीय उपस्थित होते.

ML/ML/SL

8 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *