शिवसेनेत मुख्य नेता हे पदच नाही

नागपूर, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेनेच्या घटनेनुसार मुख्य नेता हे पदच अस्तित्वात कुठे आहे असा सवाल आज आमदार अपात्रता सुनावणीत ठाकरे गटाच्या वकिलांनी करून शिंदे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
आज शिवसेना शिंदे गटाच्या खा राहुल शेवाळे यांना ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी आज उलट तपासणी दरम्यान उलट सुलट प्रश्न विचारून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तब्बल चार तास चाललेल्या सुनावणीत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी पक्ष आणि कार्यकर्ते यांना पणाला लावले असा आरोप देवदत्त कामत यांनी केला , तो शेवाळे यांनी फेटाळून लावला , याउलट उध्दव ठाकरे वेळच देत नव्हते असा दावा केला.
शिंदे गटाकडून १९९८ सालची शिवसेनेची घटना आपल्या कागदपत्रांसह जोडली असल्याने त्यावर ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला तर शिंदे गटाकडून थेट २३ जून २०१८ रोजी झालेल्या शिवसेनेच्या प्रातिनिधिक सभेलाच आव्हान दिले. अशी सभाच झाली नव्हती असा दावा राहुल शेवाळे यांनी यावेळी केला.
ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने सर्व खासदारांमध्ये नाराजी होती , हा निर्णय बदलून भाजपा सोबत जाण्याचा आग्रह त्यांनी ठाकरे यांना केला होता, यासाठी कार्यकारिणी ची बैठक बोलावण्याची मागणीही त्यांनी केली होती, मात्र उध्दव ठाकरे हे वेळच देत नव्हते त्यामुळे कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज होते असे शेवाळे यांनी आज आपल्या साक्षीत सांगितले. Chief leader is not a position in Shiv Sena
ML/KA/PGB
9 Dec 2023