दिव्या देशमुखच्या घरी जाऊन दिली सरन्यायाधीशांची शाबासकी

 दिव्या देशमुखच्या घरी जाऊन दिली सरन्यायाधीशांची शाबासकी

नागपूर, दि. २ : दिव्याने यंदाच्या वर्ल्ड चेस चॅम्पियन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावत जगभरात तिरंगा फडकवला. अवघ्या 19 व्या वर्षी ही दैदीप्यमान कामगिरी बजावत तिने इतिहास घडवला. देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी बुद्धीबळ विश्व विजेती दिव्या देशमुख हिच्या नागपूरमधील शंकरनगर येथील घरी जाऊन तिला शुभेच्छा देत शाबासकी दिली. आमचे तीन पिढ्यापासूनचे कौटुंबिक नाते आहे, दिव्याचा विजय हा कौटुंबिक आनंदाचा क्षण आहे, अशी भावना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 2025 ची FIDE महिला विश्वचषक विजेती प्रथम भारतीय महिला, ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुख यांचा भव्य ‘नागरी सन्मान सोहळा’ आज नागपूर येथे संपन्न झाला. राज्य सरकारच्यावतीने नागपूरकन्या आणि महाराष्ट्रकन्या म्हणून दिव्याचा सत्कार करत तिला 3 कोटी रुपयांचे पारितोषिकही देण्यात आले. यावेळी, दिव्यामुळे महाराष्ट्राची, देशाची मान जगभरात उंचावल्याची भावना मुख्यमंत्र्‍यांनी व्यक्त केली.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *