विठ्ठल मंदिराच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून चिकन मसाल्याची पाकीटं

 विठ्ठल मंदिराच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून चिकन मसाल्याची पाकीटं

पंढरपूर, दि. १८ : पंढरपूरमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विठ्ठल मंदिरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बीव्हीजी कंपनीकडून चिकन मसाला पाकीटं दिवाळी भेट म्हणून देण्यात आली आहे.त्यामुळे वारकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. बीव्हीजी कंपनी विठ्ठल मंदिरात सुरक्षा रक्षक पुरवते. वारकरी परंपरेनुसार शाकाहार ही जीवनशैली मानली जाते. असे असतानाही या तीर्थक्षेत्री कर्माचाऱ्यांमा ‘चिकन मसाल्या’सारख्या वस्तूंची भेटवस्तू म्हणून वाटप झाल्याने अनेक भक्तांचा भावनिक रोष व्यक्त होत आहे.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने या कंपनीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून कंपनीला नोटीस बजावली आहे.विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी ही माहिती दिली आहे. राजेंद्र शेळके म्हणाले की, ‘सदरची घटना लक्षात आल्यानंतर ताबडतोब कंपनीने वाटप थांबवलेलं आहे. कारण मसाले असले तरी त्याच्यावरती जे छायाचित्र आहे ते आक्षेपार्ह आहे. पांडुरंगाच्या या पवित्र भूमीत या मंदिराचा आणि येथील सर्वांनीच या मंदिराचे पावित्र्य जपणं गरजेचं आहे. सदरची बाब मंदिर समितीने गांभीर्याने घेतलेली आहेत सदर कंपनीला कालच मंदिर समितीमार्फत नोटीस दिलेली आहे आणि निश्चितच त्याच्यावरती कारवाई केली जाईल.’

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *