चिया बी ला मिळाला उच्चांकी २३ हजार रुपयांचा दर…

 चिया बी ला मिळाला उच्चांकी २३ हजार रुपयांचा दर…

वाशीम, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज चिया बी खरेदीचा शुभारंभ करण्यात आला असून मुहूर्तालाच खरेदी झालेल्या चिया बी ला उच्चांकी २३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळालाय त्यामुळं शेतकऱ्याला आनंद झाला आहे. वाशीम जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात याची पेरणी झाली आहे मात्र वाशिम जिल्ह्यात बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना चीयाची मध्यप्रदेशातील नीमच मध्ये विक्री करावी लागत होती मात्र आता वाशिम मध्येच बाजारपेठ उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांची गैरसोय टळणार आहे.

अत्यंत कमी खर्चात चांगलं उत्पादन देणार पीक म्हणून चीयाची ओळख आहे तर याला बाजारात चांगले दरही मिळतात त्यामुळे वाशीम जिल्ह्यात यंदाच्या हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी चियाची पेरणी केली आहे. चिया सीड्स मध्ये अनेक पोषक तत्व असतात विशेषतः फायबरचं प्रमाण अधिक असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी चिया सिड्सचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. चिया चं उत्पादन घेताना कोणतेही रासायनिक खतं किंवा औषधांच्या फवारण्या कराव्या लागत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी बचत होते.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *