या दाक्षिणात्य भाषेत ‘छावा’ होणार प्रदर्शित

 या दाक्षिणात्य भाषेत ‘छावा’ होणार प्रदर्शित

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना आणि गाजलेल्या मराठी कलाकारांच्या ‘छावा’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: ताबा मिळवला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमा १४ फेब्रुवारी रोजी रीलिज झाला आणि २५ फेब्रुवारीपर्यंत अवघ्या १२ दिवसात या चित्रपटाची कमाई ३७२.८४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे ‘छावा’ची विजयी घोडदौड सुरू असतानाच निर्मात्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

‘मॅडॉक फिल्म्स’ या बॅनरखाली दिनेश विजान यांनी ‘छावा’ची निर्मिती केली आहे. अलिकडेच ‘मॅडॉक’च्या अधिकृत पेजवरुन सिनेमाविषयीचे एक महत्त्वाचे अपडेट देण्यात आले. त्यानुसार, हा सिनेमा आता तेलुगू भाषेतही प्रदर्शित केला जाणार आहे. तेलुगूमध्ये हा सिनेमा रीलिज केला जावा अशी मागणी वाढल्याने निर्मात्यांनी असा निर्णय घेतला. शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिण्यात आले की, ‘लोकांच्या मागणीनुसार, भारताच्या धाडसी पुत्राची महाकथा- ‘छावा’ आता तेलगूमध्ये गर्जना करण्यासाठी सज्ज आहे’. विकीनेही त्याच्या इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली.

SL/ML/SL

26 Feb. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *