संपूर्ण ताकदीने छगन भुजबळांचा प्रचार करणार

 संपूर्ण ताकदीने छगन भुजबळांचा प्रचार करणार

मुंबई दि.8(एम एमसी न्यूज नेटवर्क) : महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा अजुन सुटलेला नाही. मात्र, नाशिकमधून महायुतीने ओबीसी नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ मंत्री छगन भुजबळ यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यास संपूर्ण ताकतीने त्यांचा प्रचार करणार असल्याची माहिती ओबीसी बहुजन पार्टीचे नेते प्रकाश शेंडगे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. प्रकाश अण्णा शेडगे यांनी यापूर्वी ओबीसी बहुजन पार्टीच्या लोकसभेच्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या.आज त्यांनी तिसरी यादी जाहीर केली असून मराठवाड्यात बीड मधून यशवंत अण्णा गायके या धनगर समजातील तरुण तडफदार तरुणाला उमेदवारी जाहीर केली.

बीड मध्ये ओबीसी आणि मराठा यांच्यात मोठा वाद आहे. महायुतीने पंकजा मुंडे तर शरदचंद्र पवार गटातर्फे बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे .मात्र पंकजा मुंडे यांच्या नावाला ठिकठिकाणी विरोध होतोय. मराठा समाज विरोध करत आहे. बीड मध्ये आम्ही टी पी मुंडे यांना निवडणूक लढवण्याची विनंती करत होतो.परंतु त्यांनीच यशवंत अण्णा गायके या धनगर समजातील तरुणाचे नाव सुचविले ,असे शेंडगे यांनी सांगितले.

जालना येथे डॉ. तानाजी भोजने यांचा चांगला जनसंपर्क आहे. गरिबांसाठी त्यांनी चांगले काम केलं आहे .त्यामुळे, जालन्यात रावसाहेब दानवे यांच्या विरोधात डॉ. तानाजी भोजने हे ओबीसी पक्षाचे उमेदवार असणार आहेत. अहमदनगर मध्ये शरदचंद्र पवार गटाचे निलेश लंके आणि महायुतीचे सुजय विखे पाटील यांच्यासमोर आम्ही आमचा दिलीप खेडकर हा स्ट्रॉंग उमेदवार दिला आहे- सातारा लोकसभेत अजून प्रस्थापित पक्षांनी उमेदवार दिलेली नाही. आम्ही सुरेश कोर्डे यांना मैदानात उतरवले आहे.
परभणी मध्ये महादेव जानकर यांना तर यवतमाळ मध्ये प्रा.अनिल राठोड यांना पाठींबा पक्षाने पाठींबा जाहीर केला आहे.
हातकणंगले मतदान संघातून शेतकरी नेते राजू शेट्टी निवडणूक लढवणार असून त्यांनी आमच्या सोबत संपर्क साधला आहे.त्यांच्या पाठींब्याबाबत येत्या बुधवारी आम्ही निर्णय घेणार आहोत,असे श्री .शेंडगे यांनी सांगितले.

SW/ML/SL

8 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *