उद्यापासून चेक क्लिअरन्सची प्रक्रिया होणार जलद

मुंबई, दि. ३ : RBIने चेक क्लिअरन्सची प्रक्रिया जलद करण्यासाठी आणि पेमेंट सुरक्षा वाढवण्यासाठी अद्ययावत केलेली सेटलमेंट फ्रेमवर्क लागू केली आहे. त्यानुसार 4 ऑक्टोबरपासून बँका त्याच दिवशी चेक क्लिअर करतील. सध्या चेक ट्रंकेशन सिस्टीम (CTS) द्वारे चेक क्लिअरन्स बॅच-प्रोसेसिंग पद्धतीने चालतो. बँकांनी जाहीर केले आहे की- 4 ऑक्टोबरपासून जमा केलेले चेक त्याच कामाच्या दिवशी काही तासांमध्ये क्लिअर केले जातील. या प्रक्रियेत बँका चेकचे स्कॅन केलेले फोटो आणि मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकग्निशन (MICR) डेटा क्लिअरिंग हाऊसला पाठवतील. क्लिअरिंग हाऊस हे फोटो दिवसभर देयक देणाऱ्या बँकेकडे त्वरित पाठवेल.
देयक देणाऱ्या बँकेला चेकचा फोटो मिळाल्यावर लगेच काम करावे लागेल. कन्फर्मेशन विंडो सकाळी 10 ते सायंकाळी 7 पर्यंत असेल.
प्रत्येक चेकला एक expiry time असेल. बँका या चेकवर रिअल-टाईममध्ये प्रक्रिया करतील आणि क्लिअरिंग हाऊसला माहिती त्वरित परत पाठवतील.
आरबीआय ही नवीन प्रणाली दोन टप्प्यांत लागू करत आहे:
पहिला टप्पा (4 ऑक्टोबर ते 2 जानेवारी 2026): सर्व चेकना कन्फर्मेशनसाठी सायंकाळी 7 वाजेपर्यंतची अंतिम मुदत असेल. जर ७ वाजेपर्यंत कन्फर्मेशन मिळाले नाही, तर चेक आपोआप मंजूर (approved) मानला जाईल आणि सेटलमेंट पूर्ण होईल.
दुसरा टप्पा (3 जानेवारी 2026 पासून): बँकांना चेक क्लिअर करून उत्तर देण्यासाठी फक्त तीन तासांची मुदत मिळेल. उदाहरणार्थ: जर एखादा चेक सकाळी 10 ते 11 दरम्यान आला. तर त्याचे कन्फर्मेशन दुपारी 2 वाजेपर्यंत देणे बंधनकारक असेल.
SL/ML/SL
3 Oct. 2025