प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांना विदर्भ गौरव पुरस्कार

नागपूर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने स्व. माणिक लाल गांधी यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा 2024 चा विदर्भ गौरव पुरस्कार प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळेला त्यांच्या पत्नी देखील उपस्थित होत्या. नागपुरातील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सच्या सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यात ज्येष्ठ मेंदू रोग तज्ञ पद्मश्री डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम, ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे, गिरीश गांधी तसेच प्रतिष्ठानचे श्रीराम काळे ऍड. निशांत गांधी उपस्थित होते.
केवळ विद्वत्ता असून चालत नाही त्या विद्वत्तेला परिश्रमाची जोड हवी असते विष्णू ने हिम्मत दाखविल्यामुळेच आज देशातच नव्हे तर अमेरिकेतही स्वतःचा डंका त्याने वाजवीला आहे. तो त्याच्या प्रत्येक रेसिपीमध्ये जीव ओततो. समर्पणामुळेच तो यशस्वी ठरला आहे, त्याने पाककलेला साता समुद्रापार प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्याने आता स्वतः सारखेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे युवा शेफ घडवित पाककलेचा लौकिक वाढवावा असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी व्यक्त केले.
कलाकार व्यावसायिक जीवनात फारसे यशस्वी होत नाही पण विष्णू मनोहर व्यावसायिक जीवनातही यशस्वी झाले कारण त्याच्यात हिम्मत आणि प्रयोगशीलता आहे ज्यामुळे महाराष्ट्राच्या पाककलेल्या त्यांनी स्वतः समुद्रा पार प्रतिष्ठा मिळवून दिली असेही ते म्हणाले.
ML/ML/PGB
2 Dec 2024