शेफ नीता अंजनकर यांनी तयार केली एक हजार किलो आम्बिल
नागपूर, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कॅन्सरसारख्या आजाराशी झुंज देत सुप्रसिद्ध शेफ नीता अंजनकर यांनी आज एक हजार किलोची आम्बिल तयार करण्याचा उपक्रम केला. एशीया बुक ऑफ रेकॉर्ड च्या ज्युरीनी आज या उपक्रमाची नोंद घेतली. सुप्रसिद्ध शेफ निता अंजनकर यांना 10 वर्षा आधी ब्रेस्ट कॅन्सर च्या भयंकर आजाराने विळखा घातला होता . मात्र त्यांनी या आजारावर मात केली आणि त्यानंतर पुन्हा त्यांना एक महिन्या पूर्वी लंग्ज च्या कर्करोगाने आपल्या कचाट्यात ओढले. तरी देखील त्यांनी या रोगाला हसतहसत पुढे जाऊन एक हजार किलोची आंबील तयार करण्याचा विक्रम करण्याची हिम्मत दाखवली आणि आज त्यांनी हा विक्रम देखील पूर्ण केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा वर्ष मिलेट्स वर्ष म्हणून घोषित केल्यानंतर भरड धान्याची आंबील करण्याचा उपक्रम त्यांनी ठरवला. कर्करोगाशी झुंज देणाऱ्या कॅन्सर वॉरियर्स साठी हा उपक्रम केल्याचे निता अंजनकर यांनी सांगीतले. आशिया बुक ऑफ रेकॉर्डने या उपक्रमाची नोंद घेतली आहे. रोग किती ही मोठा असला तरी आपण त्याला हसत हसत पुढे जावं असा सल्ला या निमित्ताने निता अंजनकर यांनी दिला. अंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी देखील या आयोजनात उपस्थित राहून निता अंजनकर यांच्या या विक्रमाचे कौतुक केले. आंबील तयार झाल्यानंतर नागरिकांनी त्याचा आस्वाद देखील घेतला.
ML/ML/SL
29 April 2024