दक्षिण आफ्रिकेतून विशेष विमानाने चित्त्यांचे भारतात आगमन

ग्वाल्हेर,दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दक्षिण आफ्रिकेतून आणलेले 12 चित्ते शनिवारी आज सकाळी एका विशेष विमानाने ग्वाल्हेर एअरबेसवर पोहोचले. या ठिकाणाहून त्यांना लष्कराच्या 4 चिनूक हेलिकॉप्टरने कुनो नॅशनल पार्कमध्ये नेण्यात आले. चित्यांच्या स्वागतासाठी कुनो उद्यान सज्ज झाला आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि केंद्रीय वनमंत्री भूपेंद्रसिंह यादव यांची प्रमुख उपस्थिती होतेय त्यांच्या उपस्थितीत जंगलात सोडण्यात येईल.
गेल्या वर्षी 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कुनो येथे नामिबियातून 8 चित्ते आणण्यात आले होते, जे कुनोच्या जंगलात रमले आहेत. आता आणखी दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते कुनो येते आणले जात आहेत. यांना शुक्रवारी संध्याकाळी दक्षिण आफ्रिकेतील ओरटेम्पो विमानतळावरून विशेष विमानाने पाठवण्यात आले.
कुनोला येणाऱ्या या चित्त्यांना तिथे उभारलेल्या 9 क्वारंटाईन एन्क्लोजरमध्ये सोडले जाईल. हे चित्ते एका महिन्यासाठी या ठिकाणी राहतील. कारण त्यांना आफ्रिकेत 7 महिने विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या चित्त्यांच्या आगमनानंतर उद्यानातील चित्त्यांची एकूण संख्या 20 होईल.
बारा चित्त्यांपैकी दोन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जंगलात सोडण्यात आले तर उर्वरित चित्ते केंद्रीय वनमंत्री आणि इतर पाहुण्यांच्या हस्ते सोडण्यात आले. कोपऱ्यात पाच हेलिपॅड आधीच बांधले आहेत.
SL/KA/SL
18 Feb. 2023