अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांचा,गावकऱ्यांचा जल्लोष.
जालना, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षणासाठी लढा देऊन अखेर आरक्षण पदरात पडून घेणारे मनोज जरांगे पाटलांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी मराठा आंदोलकांनी आनंदाने नाचून जल्लोष साजरा केलाय.
मनोज जरांगे पाटील मागच्या चार पाच महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत.अंतरवाली सराटीत त्यांनी हे आंदोलन सुरु केलं होतं,आणि आरक्षणाच्या आरपार लढाईसाठी इथूनच मुंबईला कूच केले होते.
त्यानंतर आज त्यांच्या आंदोलनाला यश आलं असून सरकारनं त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळं राज्यभरातला मराठा समाज जल्लोष साजरा करत आहे. अंतरवाली सराटीतही मराठा आंदोलकांनी गाण्यावर डान्स करत जल्लोष साजरा केलाय.
या आंदोलन दरम्यान आमचा ढाण्या वाघ एक इंचही हलला नाही,कुणापुढे झुकला नाही म्हणून गरजवंत मराठ्यांना आता आरक्षणाचा लाभ होईल.आम्ही गावकरी देखील तसूभर मागे राहिलो नाही. जरांगे यांच्या खांद्याला खांदा लाऊन गावकरी उभे राहिले,त्यामुळे आरक्षण मिळाल्याचा आनंद होतोय अशा गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत.खऱ्या अर्थाने आज पासून अंतर वालीत दिवाळी सुरू झाली आहे.
ML/KA/SL
27 Jan. 2024