दूरसंचार विभागात फसवणूक झाली, मग ‘ चक्षु ‘ योजनेचा लाभ घ्या

पुणे, दि .४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दूरसंचार विभागाकडून नागरिकांसाठी चक्षु ही सुविधा आज केंद्रिय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. चक्षु या योजनेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना फोन द्वारे अर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपी विरोधात पोलिसांसोबत दूरसंचार विभागाकडून कारवाई कऱण्यात येरणार आहे.
या साठी www.sancharsathi.gov.in वर आपली तक्रार नोंदवता येईल. असे केंद्रिय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दूर्दृष्य प्रणाली द्वारे माध्यमांना सांगीतले . नागरिकांच्या तक्रारी नंतर रोज 2500 पेक्षा जास्त सायबर गुन्ह्यातील नंबर ब्लॉक कऱण्यात येत आहात असे ही वैष्णव यांनी सांगीतले. याचा पुढचा भाग म्हणजे चक्षु असल्याचे केंद्रिय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगीतले.
या शिवाय नागरिक केंद्रित योजना केन्द्र सरकार आखत असल्याचे वैष्णव यांनी सांगीतले. आता पर्यंत संचारसाथी या योजेअंतर्गत 1 हजार कोटीची रक्कमेची फसवणूक वाचवली असून 1 कोटी सिम कार्ड बंद कऱण्यात आली असल्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगीतले.
ML/KA/SL