चवदार तळे, पाणी शुद्धीकरणासाठी नवी योजना

 चवदार तळे, पाणी शुद्धीकरणासाठी नवी योजना

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळ्याचे पाणी कायम शुद्ध राहावे यासाठी अमृतसरच्या सुवर्ण मंदिर सरोवराच्या धर्तीवर साडे पाशष्ठ कोटींची योजना आखण्यात आली असून ती येत्या पंधरा दिवसात उच्च स्तरीय समितीकडे नेऊन त्याला मंजुरी दिली जाईल आणि लवकरच त्याचं काम सुरू केलं जाईल अशी ग्वाही प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिली.

यासंदर्भातील प्रश्न संजय गायकवाड यांनी उपस्थित केला होता, त्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, अनिल देशमुख, बाळासाहेब थोरात आदींनी उप प्रश्न विचारले. या योजनेशिवाय हा परिसर सौंदर्यीकरण करण्याचा साठ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून त्याला मंजुरी देखील देण्यात येईल अशी माहिती ही सामंत यांनी दिली.

एस टी चालक , वाहकांना लवरकच वाढीव पगार

एस टी महामंडळाच्या चालक आणि वाहक यांना सध्या सरासरी अडतीस हजार पगार मिळतो , त्यात आणखी वाढ करणे , त्यांना अधिक भत्ते देणं यासाठी समिती नेमण्यात आली असून त्यांचा अहवाल आल्यावर त्यावर निर्णय घेण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री दादा भुसे यांनी या प्रश्नाच्या उत्तरात दिली. हा प्रश्न कृष्णा गजबे यांनी उपस्थित केला होता. त्यावर संजय केळकर , बच्चू कडू , बाळासाहेब थोरात, रोहित पवार आदींनी उप प्रश्न विचारले.

एस टी महामंडळाच्या ताफ्यात ५,१५०. इलेक्ट्रिक बस दाखल करण्यात आल्या असून , पाच हजार वाहनांचे रूपांतर LNG मध्ये करण्यात आलं आहे याशिवाय २,४२० BS सहा दर्जाची नवीन बस खरेदी करून ही सेवा उंचावण्याचा प्रयत्न सुरू आहे असं ही भुसे यांनी सांगितलं.

ML/ML/SL

2 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *