ठाण्यात मुसळधार पावसात छटपूजेसाठी महिलांची गर्दी..

 ठाण्यात मुसळधार पावसात छटपूजेसाठी महिलांची गर्दी..

कृत्रिम तलावात छटपूजा साजरी करत पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश…

ठाणे, ता. 27: गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे शहरात काही सामाजिक संस्थांसह महापालिका प्रशासनाकडून देखील छटपूजेची तयारी केली जात आहे. यंदा ठाणे शहरात २० ठिकाणी छट पूजेसाठी सोयी सुविधा उपलब्ध करुन दिली गेली होती. यामध्ये सात ते आठ ठिकाणी महापालिकेच्या वतीने कृत्रीम तलाव तयार निर्माण केले होते. दरम्यान अनेक भक्तांनी कृत्रीम तलावातील पूजेला अधिक प्राधान्य दिल्याने यंदा ठाण्यात पर्यावरण पूरक छट पूजा साजरी करण्यात आली. मात्र या छटपूजेच्या उत्साही वातावरणात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांच्या उत्साहात भंग पडला.

उत्तर भारतीयांचा छटपूजा हा मोठा सण असून यंदा हा सण २७ ऑक्टोबर आणि २८ ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जाणार आहे. दिवाळी झाली की, उत्तर भारतीयांना छटपूजेचे वेध लागतात. गेल्या काही वर्षात मुंबईसह ठाणे शहरातही उत्तर भारतीयांची संख्या वाढली असून छट पूजेचे प्रस्थही वाढले आहे. मात्र मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने छटपूजेच्या उत्साही वातावरण भंग पडला असून स्त्रियांनी भर पावसात छट पूजा मनोभावे साजरी केली. दरम्यान ठाणे शहरातील उपवन तलाव, रायलादेवी तलाव, कोलशेत , घोडंबदर, ब्रह्मांड, कळवा, मुंब्रा, शीळ-डायघर, मासुंदा तलाव अशा २० ठिकाणी मोठ्याप्रमाणात छटपूजा साजरी करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

यामध्ये रायला देवी येथे रायलादेवी तलाव छटपूजा सेवा समिती व महापालिकेच्या वतीने गेले २२ वर्षांपासून छटपूजेची तयारी केली जाते. यंदा याठिकाणी छटपूजेचे २२वे वर्ष असून महापालिकेच्या वतीने कृत्रीम तलाव देखील तयार केले होते. दरम्यान याठिकाणी आलेल्या नागरिकांनी कृत्रिम तलावात पर्यावरण पूरक छट पूजा साजरी करत पर्यावरण संरक्षण केले पाहिजे असा संदेश दिला.

छट मताचे हे पर्वत गेले अनेक वर्षांपासून साजरा होत असून येथील माता बहिणीने आपल्या कुटुंबाच्या सुखा- समृद्धीसाठी हा प्रत करत असतात. या पूजेमध्ये सूर्याला मावळताना व उगवताना अर्ग देऊन सूर्याची पूजा केली जाते.
दरम्यान यंदाच्या वर्षी छट मातेकडे हीच प्रार्थना राहील की महाराष्ट्रातील गोरगरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर पुन्हा एकदा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांना विराजमान कर अशी प्रार्थना राम रेपाळे यांनी छट मय्याकडे केली आहे.

सध्या महाराष्ट्रातील भौगोलिक वास्तव्य कोणतेही असा भाग नाही जिथे छट पूजा केली जात नाही. महाराष्ट्रातील अध्यात्मिक पठाण जर कोणत्या व्यक्तीचे नाव लिहिलं पाहिजे तर एकच नाव असेल ते म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सनातन धर्माला जतन करत या राष्ट्रातील व्यापक पद्धतीने सर्वांना एकत्र बांधून ठेवत आहे. उत्तर भारतातील संपूर्ण भारत हा वागळे स्टेट इथे बसला असून या ठिकाणी शिवसेना पक्षातील नेता मंडळी उत्तर भारतीय समाजातील ही परंपरागत छटपूजा यामध्ये मदत व सहभागी होत असून छट मातेकडे एकच प्रार्थना असेल की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विराजमान करावे असे उत्तर भारतीय संस्थेचे प्रमुख गुलाब दुबे यांनी सांगितले.

ठाण्यात रायलादेवी येथे छठपूजेच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावत सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की थोडीशी पावसामुळे समस्या निर्माण झाली असली तरी आपल्या बहिणी अत्यंत श्रद्धेने सूर्यदेवाची पूजा करत आहेत. गेल्या २२ वर्षांपासून याठिकाणी छठपूजेचे आयोजन होत असून हा उत्सव एकता, संस्कृती आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. शिंदे म्हणाले की, छठी माईच्या कृपेने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. शिंदे यांनी ‘लाडली बहन योजना’ कायम सुरू राहील असे ही आश्वासन येथे उपस्थित महिला भगिनींना दिले. तलावांच्या विकासासोबत संस्कृती जपणे हेही आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले असून या विकासादरम्यान कोणत्याही सणांना अडचण निर्माण होऊ देणार नाही असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.AG/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *