धर्मादाय रुग्णालयांना आता रुग्णांची माहिती देणं बंधनकारक…

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांमध्ये दर्शनी भागात एक फलक लावून त्यात धर्मादाय पद्धतीचे किती रुग्ण दाखल आहेत, किती जागा रिकाम्या आहेत याची माहिती देण्यात यावी असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला दिले. याचे काटेकोरपणे पालन करण्याची ताकीद त्यांना देण्यात यावी असे ही त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय अशा रुग्णालयाबाबत आमदारांना येणाऱ्या अनुभव आणि तक्रारींसदर्भात त्यांचे निवारण करण्यासाठी एक विशेष कक्ष विधानभवनात उभारला जाणार आहे . आज यासंदर्भात एक बैठक आपल्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती त्यात हा निर्णय झाला आहे असे अध्यक्षांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयकावर सभागृहात चर्चा सुरू असताना अध्यक्षांनी हे जाहीर केले, धर्मादाय रुग्णालयांमध्ये रुग्णांना छळले जाते , त्यांच्याकडून भरमसाठ प्रमाणात बिले वसूल करण्यात येतात, रुग्णांना दखल करून घेण्यास टाळाटाळ केली जाते. धर्मादाय अंतर्गत राखीव जागा नाकारल्या जातात, आयुष्यमान भारत कार्ड काढलेल्या रुग्णांना नाकारले जाते, अशा प्रकारच्या तक्रारी सदस्यांनी सभागृहात केली होती. आधी केवळ ९४ रुग्णालयांना केवळ नियम लागू होता मात्र आता कायद्यात सुधारणा करून आणखी ३०३ रुग्णालयांची भर त्यात घालण्यात आली आहे, अशी माहिती विधी आणि न्याय विभागाचे मंत्री आशिष जयस्वाल यांनी यावेळी दिली.
ML/ML/SL
20 March 2025