तुळजापुरात ड्रग्ज तस्करी प्रकरणी दोषारोपपत्र जारी

तुळजापूर, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील एक महत्त्वाचे तीर्थस्थान असलेल्या तुळजापूरमध्ये दोन महिन्यांपूर्वी एक मोठे ड्रग तस्करी प्रकरण उघडकीस आले होते. यामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक वर्तुळाला धक्का बसला होता. या प्रकरणात आता तब्बल साठ दिवसांनंतर दोषआरोपपत्र जारी करण्यात आले आहे. 10 हजार पानांचे हे दोषारोपपत्र आहे. दोषारोप पत्रात अनेक गंभीर मुद्द्याचा उल्लेख करण्यात आला आहे. एकूण 35 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. 14 आरोपींना अटक करण्यात आली. 21 आरोपी फरार आहेत. तर, 80 जणांना नोटीस बजावण्यात आली आहे.
तामलवाडी पोलिसांनी धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयात तुळजापुरात ड्रग्ज तस्करी प्रकरणी दोषारोपपत्र दाखल केले आहे. आरोपीचे जवाब, घटनास्थळ, पंचनामा, सिडीआर या सह इतर बाबींचा दोषारोप पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. मुंबई, सोलापूर, पुणे येथील ड्रग्ज कनेक्शन असल्याचा ही उल्लेख या दोषारोपत्रात करण्यात आला आहे.
तुळाजापुर तालुक्यातील तामलवाडी इथे 15 फेब्रुवारी रोजी ड्रग्जचा मोठा साठा जप्त केला होता. तेव्हापासून ड्रग्ज तस्करीबाबत अनेक खुलासे समोर आलेत. याप्रकरणात पोलिसांनी ड्रग्ज पेडलर्सना अटक केली. त्यानंतर या ड्रग्ज विक्रिचे धागेदोरे मुंबईपर्यंत पोहोचली. मुंबईतून ड्रग्ज तस्करीप्रकरणी संगीता गोळे हिला अटक करण्यात आली. विशेष पथकांची नेमणूक करत पोलिसांकडून तपास केला जातोय. यात पुजा-यांचा सहभाग असल्याने निदर्शनास आल्याने खळबळ उडाली होती.
SL/ML/SL
15 April 2025