ऑनलाईन पेमेंटसाठी शुल्क लागू होण्याची शक्यता
मुंबई,दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क):UPI द्वारे मोबाईल वरून ऑनलाईन पेमेंट करणे आता सगळ्यांच्याच रोजच्या सवयीचे झाले आहे. हजारोंच्या व्यवहारांपासून ते अगदी भाजी घेण्यासाठीच्या लहान रक्कमेचे व्यवहार देखील Online Payment द्वारे सहज केले जातात.Online Payment सहज सुलभ झाल्याने ग्राहक- विक्रेते साऱ्यांचीच चांगली सोय झाली होती. विशेष म्हणजे हे या व्यवहारासाठी अद्याप कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. मात्र आता UPI Payment च्या वापरावर मर्यादा येणार आहे, कारण त्यासाठी शुल्क लागू करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे.
एनपीसीएल National Payments Corporation of India (NPCI) या देशातील रिटेल पेंमेट आणि सेलटमेंट सिस्टीम चालवणाऱ्या संस्थेकडून आता Online Payment वर शुल्क आकारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. देशातील 80 टक्क्यांहून अधिक व्यवहार Google Pay आणि Phone Pay याद्वारे केले जातात. हे थर्ड पार्टी सर्विस प्रोव्हायडर आहेत. यांच्यावर आता NPCI द्वारे 30 % शुल्क आकारले जाण्याचा विचार सुरू आहे.
31 डिसेंबर नंतर NPCL थर्ड पार्टी प्रोव्हायडर UPI App वर कडक निर्बंध लागू करण्याची शक्यता असून काही मर्यादीत व्यवहारांपुढील व्यवहारांवर शुल्क लागू होऊ शकते. याची अमंलबजावणी झाल्यास मात्र ग्राहकांना पुन्हा रोखीच्या व्यवहारांकडे वळावे लागू शकते.
Charges may apply for online payment
SL/KA/SL
23 Nov. 2022