चारधाम यात्रेस आजपासून सुरुवात

 चारधाम यात्रेस आजपासून सुरुवात

डेहराडून,दि.२२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता पावलेल्या उत्तराखंडातील चारधाम यात्रेला आज अक्षय्यतृतीयेच्या मुहुर्तावर सुरुवात झाली आहे. येत्या ५ दिवसात यात्रेकरू बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्रीला भेट देतील. काल पर्यंत या यात्रेसाठी १६ लाख भाविकांनी नोंदणी केली आहे.

सर्वप्रथम गंगोत्री धामचे दरवाजे आज दुपारी १२.३० वाजता उघडले. गंगोत्री मंदिर ११ क्विंटल झेंडूच्या फुलांनी सजवले आहे. त्याचवेळी खरसाळी येथून सकाळी ८.२५ वाजता माता यमुनेची डोली निघाली. यमुनोत्री धामचे दरवाजे दुपारी १२.४१ वाजता उघडतील. केदारनाथ धामचे दरवाजे २५ एप्रिलला आणि बद्रीनाथ धामचे दरवाजे २७ एप्रिलला उघडले जातील.

दरम्यान, उत्तराखंड सरकारने मोजक्याच संख्येने यात्रेकरूंना भेट देण्यावरील बंदी उठवली आहे. भाविकांची ऑनलाइन आणि ऑफलाइन नोंदणी सुरू राहणार आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले की, चार धामची पहिली पूजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने करण्यात आली. कारण ते चार कारण ते चार धाम आणि भगवान महादेवाचे भक्त आहेत.

दरम्यान उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी नुकतेच सांगितले होते की, चारधाम यात्रेदरम्यान आरोग्य तपासणीसाठी यात्रा मार्गावर आरोग्य एटीएम बसवले जातील. त्यामुळे भाविकांना खूप मदत होणार आहे. 15 एप्रिलपासून यात्रा मार्गावर डॉक्टर, पॅरामेडिकल कर्मचारी आणि आरोग्य सुविधा तैनात करण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांबाबत केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल, असेही सरकारने म्हटले आहे. 3 एप्रिल रोजी, राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. धनसिंग रावत यांनी आढावा बैठकीत सांगितले की, गरज भासल्यास बसस्थानक, रेल्वे स्टेशन आणि विमानतळासह सार्वजनिक ठिकाणी कोविड लसीकरण शिबिरे देखील सुरू केली जातील.

चारधाम यात्रेसाठी कसे पोहोचावे?
ज्यांना विमानाने यायचे आहे त्यांना डेहराडूनच्या ग्रँट जॉली विमानतळावर पोहोचावे लागेल. जर तुम्हाला ट्रेनने यायचे असेल तर तुम्ही ऋषिकेश, हरिद्वार किंवा डेहराडून रेल्वे स्टेशनवर पोहोचू शकता. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या तीन शहरांमधून बसेस किंवा टॅक्सी उपलब्ध आहेत.

ML/KA/SL

22 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *