मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी विधानभवनाच्या पायर्‍यांवर घोषणाबाजी…

 मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी विधानभवनाच्या पायर्‍यांवर घोषणाबाजी…

नागपूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  घेतले खोके भूखंड ओके… भ्रष्टाचारी सरकारचा निषेध असो… खोके सरकार हाय हाय… खोके घेऊन भूखंडाचा श्रीखंड खाणार्‍या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो … भूखंड गैरव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा… ‘मित्रा’ चे लाड करणार्‍या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा…मुख्यमंत्र्यांचा कारनामा द्यावाच लागेल राजीनामा…या सरकारचं करायच काय, खाली डोकं वर पाय…अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.Chanting on the steps of the Vidhan Bhavan

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार Leader of Opposition Ajit Pawar आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी सलग तिसऱ्या दिवशी विधानभवन परिसर दणाणून सोडला.

आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा लावून धरल्याचे पहायला मिळाले.

ML/KA/PGB
21 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *