वाढत्या तापमानामुळे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी वेळांमध्ये बदल
चंद्रपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चंद्रपूर जिल्ह्यातील तापमान चढते असल्याने जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी वेळांमध्ये बदल करण्यात आलाय. त्यानुसार सकाळची फेरी 5.30 ते 9.30 तर दुपारची फेरी 3 ते 7 वाजेपर्यंत अशी निश्चित करण्यात आली आहे. Changes in safari timings of Tadoba-Andhari Tiger Reserve due to rising temperatures
हे नवे नियम 20 एप्रिलपासून लागू होणार आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प व्यवस्थापनाने कोअर क्षेत्राचे उपसंचालक एन व्ही काळे यांच्या स्वाक्षरीने हा आदेश जारी झाला आहे. उन्हाळा म्हणजे हमखास व्याघ्रदर्शनाचा काळ आहे. सफारीसाठी नोंदणी केलेल्या पर्यटकांनी नव्या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.
ML/KA/PGB
19 Apr 2023