उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी नियमात बदल
नागपूर, दि. ३०: मुंबईत म्हाडाने बांधणी केलेल्या मात्र आता मोडकळीस आलेल्या ३८९ उपकर प्राप्त अर्थात सेस इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी आवश्यक नियम बदल करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली.
मुंबईतील सुमारे दीड लाख रहिवाशांना याचा फायदा होईल, त्यांना आताच्या १८० ते २०० फुटांच्या घरा ऐवजी ३०० फुटांचे घर नवीन विकसित इमारतीत मिळू शकेल असं त्यांनी स्पष्ट केलं.
पूर्वी असलेल्या नियमामुळे या इमारती विकसित करण्यासाठी कोणीही विकासक पुढे येत नव्हते , आता नियम बदल केल्यानं तीन किंवा प्रत्यक्ष उपलब्ध चटई क्षेत्र निर्देशांक देण्यात येईल असं मुख्यमंत्री म्हणाले, यामुळे या रहिवाशांना दिलासा मिळू शकेल असंही मुख्यमंत्री म्हणाले.
ML/KA/SL
30 Dec. 2022