सीमेवरील रिट्रीट सेरेमनीच्या वेळेत बदल

नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत-पाकीस्तान सीमेवर दररोज सायंकाळी होणारा बिटींग ग रिट्रीट सेरेमनी हा जोशपूर्ण कार्यक्रम हजारो लोकांच्या उपस्थितीत पार पडतो. देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या या कार्यक्रमाला दोनही देशांतील, तसेच देश- विदेशातील पर्यटक आवर्जून हजेरी लावतात. आता या कार्यक्रमाच्या वेळेत BSF कडून बदल करण्यात आला आहे.
अमृतसरच्या अटारी बॉर्डरसर फाजिल्का आणि फिरोजपूरमध्ये आता सायंकाळी 6 ऐवजी 6.30 वाजता रिट्रीट सेरेमनी असेल. उन्हाचा तडाखा वाढून दिवस मोठा झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवार (दि. १६)पासून या आदेशांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
सुमारे 40 मिनिटे चालणाऱ्या रिट्रीट सोहळ्यात संपूर्ण वातावरण देशभक्तीने भरून जाते. भारताच्या सीमेवर असलेले भारतीय आणि पाकिस्तानच्या बाजूचे पाक नागरिक आपल्या देशाचा जयजयकार करत देशभक्ती दर्शवतात. देशभक्तीपर गाण्यांवर याठिकाणी लोक थिरकताना दिसतात.
SL/KA/SL
17 June 2023