चांद्रयान- ३ : प्रक्षेपणासाठी सज्ज

 चांद्रयान- ३ : प्रक्षेपणासाठी सज्ज

श्रीहरीकोटा, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताच्या चांद्रयान-३ या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या महत्त्वाकांक्षी यानाच्या प्रक्षेपणाची तयारी आता पूर्ण झाली आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून १४ जुलै रोजी दुपारी २.३५ वाजता ‘चांद्रयान-३’ अंतराळात प्रक्षेपित केले जाईल.देशाच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-3 चे काऊंटडाऊन दुपारी सुरू होईल. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून शुक्रवारी दुपारी 2:35 वाजता प्रक्षेपण होणार आहे.

त्यापूर्वी, इस्रोचे शास्त्रज्ञ चांद्रयान-3 चे मिनी मॉडेल घेऊन तिरुपती मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. मोहीम यशस्वी व्हावी यासाठी त्यांनी प्रार्थना केली.24-25 ऑगस्टला चांद्रयान चंद्रावर उतरणार आहे. पुढील 14 दिवस, रोव्हर लँडरभोवती 360 अंशात फिरेल आणि अनेक चाचण्या होतील.चंद्राच्या पृष्ठभागावर चालताना रोव्हरच्नेया चाकांच्या खुणांची छायाचित्रे देखील लँडर पाठवेल.

चंद्रावर राष्ट्रध्वज पाठवणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे. तसेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचणारा पहिला देशही ठरेल. हे तेच क्षेत्र आहे जिथे चांद्रयान-1 दरम्यान मून इम्पॅक्ट प्रोब सोडण्यात आले होते आणि इस्रोने पाणी शोधले होते. चांद्रयान-2 चे क्रॅश लँडिंग येथेच झाले होते. ६ सप्टेंबर २०१९ च्या पहाटे चंद्रावर लँडर व रोव्हर आदळल्यानंतर चांद्रयान-२ मोहीम अंशत: अयशस्वी झाली होती. त्यामुळे भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

SL/KA/SL

13 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *