Chandrayaan-2 ने पाठवली चंद्राची विशेष माहिती
मुंबई, दि. ८ : भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO च्या महत्त्वाकांक्षी चंद्रयान मोहीम Chandrayaan-2 बद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. Chandrayaan-2 ऑर्बिटर 2019 पासून चंद्राभोवत परिक्रमा करत आहे. 2019 ते आतापर्यंत त्याने चंद्राच्या पृष्ठभागाशी बरीच माहिती गोळा केली आहे. ही माहिती Chandrayaan-2 ने पाठवली आहे. हीच माहिती आता ISRO ने सर्वसामान्य जनतेसाठी जाहीर केली आहे.
डुअल फ्रीक्वेंसी सिंथेटिक एपर्चर रडार (DFSAR) या रडारने पहिल्यांदाच L-band तंत्रज्ञानाचा वापर करून चंद्राच्या पृष्ठभागाचे फुल पोलारिमेट्रिक मॅपिंग केलं आहे. याचा अर्थ, चंद्राचा पृष्ठभाग अतिशय तपशीलवार आणि खोलवर स्कॅन केलं गेलं आहे, सुमारे 25 मीटर प्रति पिक्सेलच्या उच्च रिझोल्यूशनमध्ये हे काम झालं आहे.
अहमदाबादच्या Space Application Center (SAC) च्या वैज्ञानिकांनी या डेटाचा वापर करून चंद्रावर कुठे बर्फाचं पाणी जमा झालं आहे हे शोधून काढलं आहे. एवढंच नाहीतर पृष्ठभाग किती खडबडीत किंवा गुळगुळीत आहे आणि चंद्राच्या मातीची घनता आणि सच्छिद्रता किती आहे.
चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशांविषयी पहिल्यांदाच इतकी तपशीलवार माहिती मिळाली आहे. चंद्राचे हे भाग आजही सौरमंडळाच्या सुरुवातीच्या रासायनिक परिस्थिती जपून ठेवल्याचं मानलं जातंय. म्हणजेच, ग्रहांची सुरुवात कशी झाली आणि वेळेनुसार त्यांच्यात काय बदल झाले हे समजून घेण्यास हे भाग आपल्याला मदत करू शकतात.
SL/ML/SL