चंद्रपूर शहर पुन्हा एकदा जलमय…!

चंद्रपूर दि ५ :- जून महिन्या पासून सुरू झालेला पाऊस ऑक्टोबर महिन्यातही थांबण्याचं नाव घेत नाहीये..! सप्टेंबर महिनाभर अतिवृष्टीचा तडाखा सहन केलेल्या जिल्ह्यात, आता ऑक्टोबरमध्येही मुसळधार पावसाने हजेरी लावली .आज सायंकाळच्या सुमारास झालेल्या तासाभराच्या पावसाने चंद्रपूर शहर अक्षरशः पाण्याखाली गेलं.
गिरनार मार्गावरील एसबीआय बँकेसमोर नागरिकांना गुडघ्यापर्यंतच्या पाण्यातून वाट काढावी लागली, तर जयंत टॉकीज चौकातही हीच स्थिती पाहायला मिळाली. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक पर्जन्यमानाच्या 117 टक्क्यांहून अधिक पाऊस झाला असून, पुढील चार दिवस हीच स्थिती असल्याचे नागपूर हवामान खात्यातर्फे देखील सांगण्यात आले आहे.ML/ML/MS