सावंगी तलाव फुटला, हजारों हेक्टर शेतजमीन
पाण्याखाली…

चंद्रपूर दि २१:– संततधार पावसामुळे नागभिड तालुक्यातील सावंगी बडगे तलाव फुटल्याने हजारों हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली असून धान पिकाचे व मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लघू पाटबंधारे विभाग, पंचायत समिती अतंर्गत सावंगी बडगे येथील तलावांचे तुरुम बांधकाम करण्यांत आले. कंत्राटदारांचे हलगर्जीपणामुळे सदर बांधकाम जून महिन्या पर्यंत सुरू होते.
गेले दोन दिवस नागभिड तालुक्यात संततधार पाऊस पडल्याने तलाव तुडुंब भरले व यावर्षीच करण्यांत आलेले बांधकाम ताजे असल्यामुळे तलावांची पाड फुटल्याने हजारों हेक्टर शेतजमीन खरखडून वाहून गेली , यामुळे शेतकऱ्यांचे मोठें नुकसान झाले. तर या तलावांतील लाखों रुपयांची मच्छी वाहून गेल्याने मच्छीमार संस्थेचेही मोठें नुकसान झाले आहे. कंत्राटदारांचे हलगर्जी पणामुळे तलावांची पाड फुटली असून लाखों रुपयांचे नुकसान झाले. या कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकरी व मच्छीमारांनी केली आहे.ML/ML/MS