चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले; उपचाराची गरज.
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मंत्री चंद्रकांत पाटील Minister Chandrakant Patil यांनी महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण संस्था उभारण्यासाठी भीक मागितली असे म्हणून या थोर महापुरुषांचा अपमान केला वरून आपल्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता असे म्हणत सारवासारव केली मात्र त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यकर्त्यांने पाटील यांच्यावर शाईफेक केली. शाईफेक करण्याच्या प्रकाराचे आम्ही समर्थन करत नाही पण याप्रकारानंतर दहा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले तर या घटनेचे वार्तांकन व व्हीडिओ शूट करणाऱ्या पत्रकाराला ३०७ सारखी कलमे लावून अटक करायला लावली. चंद्रकांत पाटील हे महापुरुषांपेक्षा मोठे आहेत का? त्या पत्रकारावर एवढी कठोर कलमे लावण्याची खरेच गरज होती का? पण सूडभावनेने पेटलेल्या सरकारने तत्परतेने कारवाई केली पण महापुरुषांचा वारंवार अपमान करणाऱ्या नेत्यांवर भाजपाने कारवाई केलेली नाही असे ते म्हणाले.Chandrakant Patil lost his mental balance; Need for treatment.
चंद्रकांत पाटील यांनी माझ्यासह काही राजकीय नेत्यांवरही आगपाखड केली. माझा एकेरी उल्लेख करुन मलाच चर्चेचे आव्हान दिले. चंद्रकांत पाटील यांची आगपाखड पाहता त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे दिसत असून त्यांची आम्हाला चिंता वाटत आहे, त्यांनी लवकर चांगल्या डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत. चंद्रकांत पाटील व भाजपाच्या वाचाळ नेत्यांना गणपतीबाप्पा सुबुद्धी देवो अशी मी प्रार्थना करतो, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
ML/KA/PGB
12 Dec .2022