औरंगाबाद , चंद्रकांत खैरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

छ संभाजीनगर , दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :औरंगाबाद लोकसभेचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. आज विमानतळावर आले असताना त्यांनी माध्यम प्रतिनिंधीशी संवाद साधला. देशातील जनता इंडिया आघाडीसोबत आहे. आमची ही शक्ती चार जूनला दिसेल. शिंदेंची शिवसेना नाही, त्यांचा गद्दार गट आहे. त्यांच्या अर्ध्या जागा बदलाव्या लागत आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
निवडणुक आयोगाच्या जय भवानी या शब्दावर घेतलेल्या आपत्तीबद्दल आम्ही शिवसेनेच्या गाण्यातून तो शब्द काढणार नाही. निवडणूक आयोगाने आधी भाजपावर कारवाई केली पाहिजे, अस आदित्य ठाकरे म्हणाले. अजित पवार यांच्यावर बोलताना मी असा निर्लज्ज माणूस पाहिला नाही, ज्यांनी त्यांना घडवल त्यांच्याच पाठीत त्यांनी खंजीर खुपसला अशी टिका आदित्य ठाकरे यांनी केली. चंद्रकांत खैरे यांनी लोकसभा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शहरातील क्रांती चौक ते संस्थान गणपती यादरम्यान रोड शो केला. या रोड शो त चंद्रकांत खैरे व्यतिरिक्त अंबादास दानवे तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्ष कॉंग्रेस तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांच्या नेत्यांसोबत आदित्य ठाकरे यांनी आपली ताकद दाखवली. या रोड शो ला मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी होती.
ML/ML/PGB 22 APR 2024