मुंबईमध्ये चंद्रदर्शन, उद्या साजरी होणार ईद

 मुंबईमध्ये चंद्रदर्शन, उद्या साजरी होणार ईद

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या महिन्याभरापासून मुस्लिम धर्मियांसाठी अत्यंत पवित्र अशा रमजान महिन्याचे रोजे सुरू आहेत. ईदचे चंद्रदर्शन झाले की या महिन्याभराच्या उपवासांची सांगता करण्यात येते. आज मुंबईमध्ये चंद्रदर्शन झाले असून उद्या सर्वत्र रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे.

यावर्षी 24 मार्चपासून रमजानचा पवित्र महिना सुरू झाला. यावेळी उपवास म्हणजेच रोजे 29 किंवा 30 दिवसांचा असू शकतो. रमजानचा पवित्र महिना चंद्र पाहिल्यानंतरच सुरू होतो आणि या महिन्याच्या शेवटी चंद्र पाहूनच ईद साजरी केली जाते. यामुळेच ईदची कोणतीही निश्चित तारीख नाही. हे दरवर्षी चंद्राच्या उदयावरच ठरवले जाते.

ईद-उल-फित्र किंवा ईद हा मुस्लिम समाजाचा मुख्य सण आहे. याविषयी एक समजूत आहे की, या दिवशी पैगंबर हजरत मुहम्मद यांनी बद्रच्या युद्धात विजय मिळवला होता आणि या आनंदात दरवर्षी ईद साजरी केली जाते. इ.स. 624 मध्ये पहिल्यांदा ईद-उल-फित्र साजरी करण्यात आली असे म्हणतात. आनंद, शांती, सद्भावना आणि बंधुभाव वाढवण्यासाठी ईद सणाचे महत्त्व आहे. या दिवशी लोकं नवीन कपडे घालतात, नमाज वाचतात, मिठी मारतात, गोड शेवया खातात आणि एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देतात.

SL/KA/SL

21 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *