चांदोली राष्ट्रीय उद्यानात वाघीणीचे यशस्वी पदार्पण

 चांदोली राष्ट्रीय उद्यानात वाघीणीचे यशस्वी पदार्पण

सातारा दि २० : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये व्याघ्र संख्या वाढविण्यासाठी आज एक महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक टप्पा साध्य करण्यात आला आहे. पूर्वी नियंत्रित पिंजरा (Soft Release Enclosure) मध्ये ठेवण्यात आलेली वाघीण STR T–04 हिला दिनांक 18.11.2025 रोजी आज चांदोली राष्ट्रीय उद्यानातील नैसर्गिक जंगल क्षेत्रात यशस्वीरीत्या मुक्त करण्यासाठी दरवाजे उघडे करण्यात आले होते. गेली दोन दिवस सदर वाघीण त्याच एनक्लोजर मध्ये आत फिरत होती.

तिने आत मध्ये शिकार केली होती , ते खाऊन तेथेच आत दोन दिवस राहीली. दोन दिवस दरवाजा उघडा ठेवला होता तरी ती बाहेर गेली नाही.
आज दिनांक 21.11.2025 रोजी सकाळी 8 वाजता ती अत्यंत डौलदारपणे ती एनक्लोजर मधून बाहेर पडली आणि जंगलात निघून गेली.

चांदोलीत आगमनानंतर वाघीणीवर वैज्ञानिक पद्धतीने अनुकूलन, निरीक्षण व habituation प्रक्रिया राबविण्यात आली. या काळात तिची हालचाल, नैसर्गिक प्रतिक्रिया, शिकार प्रवृत्ती, क्षेत्रचिन्हीकरण व हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता या सर्व गोष्टींचे तज्ज्ञांच्या उपस्थितीत निरीक्षण करण्यात आले. वन्यजीव संशोधक व पशुवैद्यकीय अधिकारी (WII) यांनी दररोज तपासणी करून तिला पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केले.

वैज्ञानिक मॉनिटरिंग आणि पश्चात निरीक्षण योजना
वाघीणीच्या मानेवर रेडिओ कॉलर बसविण्यात आले असून तिचे Satellite Telemetry व VHF Antenna Tracking च्या माध्यमातून २४ तास पर्यवेक्षण केले जाणार आहे. या कामासाठी Sahyadri Tiger Reserve, Chandoli National Park आणि Wildlife Institute of India यांचे प्रशिक्षित पथक नियुक्त करण्यात आले आहे.

मुख्य निरीक्षण घटक :

  1. उपग्रह व वीएचएफ आधारित हालचाल व ठिकाणांची माहिती
  2. फील्ड पथकाद्वारे क्षेत्रनिहाय पडताळणी
  3. हालचाल, निवासस्थाने व शिकार पद्धतीचे नोंदवही लेखन
  4. मानव – वन्यजीव संघर्ष प्रतिबंधात्मक उपाय
  5. तत्पर Veterinary Rapid Response व्यवस्था

“वाघीणीने एनक्लोजरमध्ये उत्कृष्ट अनुकूलन क्षमता दर्शविली असून नैसर्गिक परिस्थितीशी सुसंगत वर्तन आढळले आहे. ती पूर्णतः तंदुरुस्त असून जंगलातील स्वावलंबी जीवनासाठी सिद्ध आहे. आम्ही WII तज्ञांच्या सहकार्याने वैज्ञानिक व जबाबदार पद्धतीने तिच्या निरीक्षणाचे पुढील टप्पे कार्यान्वित करणार आहोत. हा टप्पा सह्याद्री व्याघ्र पुनर्स्थापना उपक्रमासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.” असे चांदोली अभयारण्य व्यवस्थापनाने सांगीतले.

“महाराष्ट्रात व्याघ्र संवर्धन कार्यक्रम वैज्ञानिक पद्धतीने व दीर्घकालीन धोरणांनुसार राबविला जात आहे. सदर वाघीण पर्यावरणाशी यशस्वीरीत्या अनुकूल झाली असून नैसर्गिक वर्तनही दिसून येत आहे. STR व WII पथकाकडून तिचे सतत निरीक्षण होत असल्यामुळे सह्याद्री व्याघ्र संवर्धन प्रयत्नांना मोठी चालना मिळेल.”

राज्य शासन, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प चांदोली राष्ट्रीय उद्यान व WII यांच्या एकत्रित सहकार्याने व्याघ्र पुनर्वसन व संवर्धनाची दिशा अधिक भक्कम होत राहील. पर्यावरण संरक्षण व जैवविविधतेच्या दृष्टीने हा टप्पा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

क्षेत्र संचालक तुषार चव्हाण व भारतीय वन्यजीव संस्था चे शास्त्रज्ञ रमेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वनाधिकारी स्नेहलता पाटील , सहाय्यक वनसंरक्षक संदेश पाटील,मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, रमण कुलकर्णी, वनक्षेत्रपाल ऋषिकेश पाटील(चांदोली), अर्शद मुलानी (हेळवाक),अक्षय साळुंखे(कोयना),तुषार जानकर (पाटण),किरण माने(ढेबेवाडी), प्रदीप कोकीटकर (आंबा) व वनपाल वनरक्षक सहभागी होते.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प साठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. ह्यामुळे सह्याद्री मध्ये भविष्यात टायगर टूरिजम (व्याघ्र पर्यटन) वाढ होण्यास मदत होईल.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *