चांदोबा लिंब या ठिकाणी माऊलीचे पहिले उभे रिंगण संपन्न.

सातारा दि २७– संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी लोणंद येथून तरडगाव मुक्कामासाठी निघाली असून दरवर्षी प्रमाणे चांदोबाचा लिंब या ठिकाणी माऊलीच्या पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण पार पडले. चिकोडी येथील अंकलीकर सरकार यांचे दोन अश्व दरवर्षी पालखीच्या सोहळ्यासाठी येत असतात . चांदोबाचा लिंब या ठिकाणी माऊलींची पालखी थांबते .
मृदुंग आणि टाळांच्या नादामध्ये माऊली माऊलीचा जयघोष करीत वारकरी रमले. माऊलीच्या अश्व वायू गतीने धावले, आणि माऊली माऊलीच्या जयघोषात पहिले उभे रिंगण संपन्न झाले.
घोड्यांच्या पायाखालची माती आपल्या मस्तकी लावून जीवन धन्य झाल्याचा आनंद वारकरी भाविकांनी घेतला.
संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी सातारा जिल्ह्यात पोलीस दलाच्या वतीने सुमारे 2000 पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांच्या आरोग्य सुविधा उपलब्ध हव्यात, यासाठी पालखी मार्गावर प्रत्येकी पाच किलोमीटर अंतरावर एक याप्रमाणे पंधरा हिंदुहदय सम्राटसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने तात्पुरत्या स्वरूपात स्थापन करण्यात आलेले आहेत. लोणंद तरडगाव बरड आणि फलटण या ठिकाणी आयसीयू कक्ष स्थापन केलेले आहेत.
46 फिरत्या पथकांमार्फत वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यात येत आहे. तसेच पालखी मार्गावर 132 आरोग्य संस्था सेवाभावी वृत्तीने कार्यरत आहेत. विशेष म्हणजे पालखी मार्गावर पाणी शुद्ध करण्यासाठी 34 पथके आणि टँकर फिलींग साठी 48 पथके स्थापन करण्यात आलेले आहे, ML/ML/MS