गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा धुमाकूळ, १५ जणांचा मृत्यू, २७ रूग्ण आढळले
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. चांदीपुरामध्ये आतापर्यंत २७ संशयित रुग्ण आढळले असून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. साबरकांठा आणि अरावलीमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. येथे चार-. २७ प्रकरणांपैकी २४ गुजरातमधील आहेत, तर ३ प्रकरणं इतर राज्यातून गुजरातमध्ये आली आहेत.राज्य सरकारने सर्वांसाठी एक सूचना जारी केली आहे. चांदीपुरा व्हायरस समोर आल्यानंतर देशातील आरोग्य यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. चांदीपुरा व्हायरसमुळे अरावली, साबरकांठामधील ग्रामीण भागात संसर्गाचे वातावरण आहे. व्हायरसची आतापर्यंत १५ हून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत, त्यापैकी आतापर्यंत आठ मुलांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये ८५०० हून अधिक घरं आणि ४७ हजारांहून अधिक लोकांचे स्क्रीनिंग केले गेले आहे.
व्हायरसची लक्षणे
अचानक जास्त ताप, उलट्या, जुलाब, चक्कर येणे, डोकेदुखी, मेंदूला सूज येणे यासारखी लक्षणं दिसतात, ज्यामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो. या व्हायरसची लागण झालेली मुलं लक्षणं दिसल्यानंतर ४८-७२ तासांच्या आत मरतात. अशा परिस्थितीत हा व्हायरस लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी घातक मानला जातो