चॅम्पियन संघाची चॅम्पियन जर्सी: टीम इंडियाचे विशेष सेलिब्रेशन

टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप जिंकून आपल्या कामगिरीने इतिहास रचला आहे. या अभूतपूर्व यशानंतर, खेळाडूंनी विशेष जर्सी घालून आपल्या विजयाचे सेलिब्रेशन करण्याचे ठरवले आहे.टीम इंडियाची आज सायंकाळी मुंबईत विजयी परेड होणार आहे. यासाठी टीम इंडियाचे खेळाडू स्पेशल जर्सी परिधान करणार आहेत. जर्सीच्या डिझाइनमध्ये भारतीय तिरंग्याचे रंग आणि टी-20 वर्ल्ड कपचे लोगो आहे.