झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी चंपई सोरेन

रांची, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ED च्या कारवाईनंतर झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी आता भरून निघाली आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्ष चंपई सोरेन यांनी राज्याचे १२ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यांना १० दिवसांच्या आत बहुमत सिद्ध करावे लागणार आहेत.त्याच्यासोबत आलमगीर आलम आणि सत्यानंद भोक्ता यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. २३ वर्षाच्या आत झारखंडला १२ वा मुख्यमंत्री मिळाला आहे. गुरुवारी रात्री चंपई यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना भेटून ४७ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर केले होते. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास राज्यपालाकडून त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देण्यात आले.
झारखंड विधानसभेत एकूण ८१ जागा असून बहुमतासाठी ४१ जागांची आवश्यकता आहे. चंपई आपल्यासोबत ४७ आमदारांचे समर्थन असल्याचा दावा करत आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे २९, काँग्रेसचे १६ आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) तसेच CPI (ML) पक्षाचा एक-एक आमदार आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष भाजपाचे २५ आमदार आहे. आता येत्या १० दिवसाच्या आत चंपई यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.झारखंडमधील बहुमताचा आकडा ४१ इतका आहे. त्यामुळे बहुमत सिद्ध होत नाही, तोपर्यंत आमदारांना हैदराबादमधील हॉटेलला पाठवण्यात येणार आहे.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक होणार हे निश्चित झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे देण्यासाठी हालचाल सुरू होत्या.
SL/KA/SL
2 Feb. 2024