चक्रधर स्वामी यांचा 803 वा अवतार दिन संपन्न

 चक्रधर स्वामी यांचा 803 वा अवतार दिन संपन्न

बुलडाणा, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधर स्वामी यांच्या आज 803 वा अवतारदिन ( जयंती ) चक्रधर स्वामींच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या जाईचादेव येथील चक्रधर स्वामी मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आला होता.

सकाळीच मंगलस्नान आरती गिता पाठ, विडा अवसर आणि आचार्य ,मंहतांच्या हस्ते चक्रधार स्वामी यांच्या स्थानाचे पूजन करण्यात आलं,त्यानंतर आचार्य आंबेकरबाबा यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला , मंदीर परिसरत धर्मसभा घेण्यात आली. यावेळी चक्रकरस्वामी यांच्या जीवनचरित्रावर आचार्य यांनी आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. चक्रधर स्वामीच्या समता , मानवता , अहिंसा ममता , सर्वधर्मसमभाव स्त्री पुरुष समानता या कार्याचा संदेश समाजबांधवांना दिला चक्रधर स्वामी यत्यांच्या अवतार दिनानिमित्त परिसरातील नागरिकांनी जाईचादेव येथील चक्रधर स्वामी यांच्या मंदिरात जावून स्वामींना दंडवत घालून दर्शन घेतले. मंदिर परिसरात झालेल्या धर्मसभेला महानुभव पंथाचे समाज बांधव उपस्थित होते.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *