चैत्री यात्रेसाठी भाविकांना मिळणार विठ्ठलाचे दिवसभर मुखदर्शन

सोलापूर, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चैत्री एकादशीच्या सोहळ्यानिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठलाचे मुखदर्शन हे 15 एप्रिल पासून 21 एप्रिल पर्यंत दिवसभर भाविकांना मिळणार आहे. सध्या मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या कामामुळे विठ्ठलाचे मुखदर्शन हे केवळ पहाटे पाच ते 11 या पाच तासात मिळते. मात्र मराठी नववर्षातील पहिलीच चैत्री एकादशी आणि वारी असल्याने आता भाविकांना पूर्णवेळ दर्शन मिळणार आहे. तसेच गुढीपाडवा या नववर्षाच्या पहिल्या सणानिमित्त देखील भाविकांना पहाटे पाच वाजलेपासून रात्री अकरा वाजेपर्यंत एक दिवस मुखदर्शन मिळणार आहे.
चैत्री वारीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या माध्यमातून भाविकांना दर्शन व्यवस्था, थंड पिण्याचे पाणी, वाढत्या उन्हाळ्यामुळे भाविकांचे उष्णतेपासून संरक्षण व्हावे. यासाठीच्या विविध उपायोजना करण्यात आले आहेत. चैत्री यात्रेत 15 एप्रिल ते 21 एप्रिल पर्यंत पूर्णवेळ दर्शन मिळेल. त्यानंतर 22 एप्रिल पासून पुन्हा पहाटे पाच ते सकाळी 11 वाजेपर्यंत दर्शन पूर्ववत होणार आहे.
ML/ML/SL
5 April 2024