सातपूर मधील ट्रक कंपोनेंट कंपनीतील कामगारांनी विविध मागण्यांसाठी आझाद मैदान येथे चड्डी मोर्चा काढला.

 सातपूर मधील ट्रक कंपोनेंट कंपनीतील कामगारांनी विविध मागण्यांसाठी आझाद मैदान येथे चड्डी मोर्चा काढला.

मुंबई, दि 11
सातपूर MIDC मधील ट्रॅक कंपोनंट्स प्रा. लि. मधील कामगारांनी एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणीत मार्शल कामगार युनियन लावल्यामुळे त्याचा राग मनात ठेवून कंपनी प्रशासनाने सर्व कामगारांना कोणतीही पूर्वकल्पना न देता कामावरून काढण्यात आले आहे तरी दिनांक 17/03/2025 रोजी मा. कामगार उपायुक्त व औद्‌योगिक सुरक्षा विभागाला कळविण्यात आले होते की सदर कामाच्या ठिकाणी कंपनी प्रशासनामार्फत कामगारांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे कामगारांकडून जबरदस्तीने 16 तास काम करून घेतले जाते व कामगारांनी 16 तास काम करण्यास नकार दिल्यास त्याना कामावरून काढले जाते त्यांचे PF-ESIC वेळेवर भरले जात नाही, पिण्यास अस्वच्छ पाणी दिले जाते, सुरक्षा साहित्य पुरवले जात नाही, कामगारांकडून जबरदस्तीने अवाच्या सव्या टारगेट देऊन पूर्ण करण्यासाठी रास दिला जाती, बऱ्याच कामगारांचे अपघात होऊन त्याच्या हातांचे बोटे छाटती जाऊन कायमचे अपंगत्व आले आहे व ते अपघात दाबवण्याचं काम कंपनी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे या सर्व त्रासाला कंटाळून कामगारांनी एकत्र येत कामाच्या ठिकाणी सुरक्षा, शासकीय अधिकार व सर्व भते मिळावे याकरिता युनियन लावण्यात आली आहे. परंतु कंपनी प्रशासन कामगारांना कोणतेही अधिकार देण्यास तयार होत नाही हेल्पर कामगारांना कोणतेही स्किल सर्टिफिकेट नसताना जबरदस्तीने मशीनवर काम करून घेतले जाते. यामुळे कंपनीत मोठ्या प्रमाणात अपघात होऊन कामगाराच्या जीवाशी कंपनी व्यवस्थापन खेळत आहे तरी स्किल सर्टिफिकेट नसणाऱ्या कामगारांकडून मशीनवरील काम तात्काळ थांबवण्यात यावे बेकायदेशीर कंत्राटदार हाउसकीपिंगच्या परवान्याखाली कंत्राटी कामगारांकडून बेकायदेशीरपणे मशीन वर काम करून घेतले जाते है तात्काळ बंद करण्यात यावे अशा विविध मागण्या युनियनच्या वतीने करण्यात आल्या होत्या त्यामुळे युनियनचे सदस्य असणाऱ्या कामगारांना कामावरून कमी करण्यात येऊन त्यांच्या कुटुंबावर उपसमारीची वेळ आली आहे. तरी, कामावरून कमी केलेल्या कामगारांना कामावर परत घेण्यात यावे याकरिता मा. कामगार उपायुक्त यांच्याकडे तक्रार करूनही दोन महिन्यापासून वारंवार मीटिंग होऊनही कोणताही निर्णय मिळालेला नाही. मा. कामगार उपायुक्त कंपनी व्यवस्थापनेला आपले जे काही उत्तर असेल आपण लेखी स्वरूपात मागणी केली परंतु कंपनी व्यवस्थापन मा. कामगार उपआयुक्त यांना केराची टोपली दाखवत आहे. या सर्व मागण्यासाठी एक कामगारांनी आजार मैदान येथे चड्डी मोर्चाचे आयोजन केले असून जोपर्यंत आम्हाला नेहमी येत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन हे असेच सुरू राहणार अशी माहिती दिली.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *