मध्य रेल्वेच्या मेगब्लॉक ला सुरूवात, प्रवाशांचे हाल

ठाणे, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे स्थानकात स्थानकात ६३ तासांच्या मेगाब्लॉकला मध्यरात्रीपासूनच सुरूवात झालीय त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. काल रात्रीपासून ठाण्यात 63 तासांचा मेगाब्लॉक सुरू असून रविवारी दुपारपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
ठाणे स्थानकावरील ५ आणि ६ प्लॅटफॉर्मवरील रुंदी वाढवण्यासाठी हा विशेष मेगाब्लॉक घेण्यात येतोय. ठाणे स्थानकात स्थानकात 62 तासांच्या मेगाब्लॉकला मध्यरात्रीपासूनच सुरूवात झालीय. मुंबईहून कल्याणकडे जाणाऱ्या फास्ट मार्गावर 62 तासांचा तर मुंबईकडे जाणाऱ्या स्लो मार्गावर 12 तासांचा हा मेगाब्लॉक आहे. मध्य रेल्वेवर यामुळे वेळापत्रक कोलमडलंय. गाड्यात 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत आहेत. आज कामाचा दिवस असल्याने ऑफिसला जाणाऱ्यांचे हाल सुरू झालेत.
कल्याण डोंबिवली ठाणे या प्लॅटफॉर्मवर गर्दी आहे. सकाळची कामाची वेळ, उकाडा आणि गाड्या उशिरा यामुळे प्रवासी हैराण झालेत. आज मध्य आणि हार्बर मार्गावरील 161 लोकल रद्द आहेत, सध्या ठाणे स्थानकात 20 मिनिटांनी एक अशी मुंबईकडे जाणारी लोकल येत आहे. एकच ठिकाणी फास्ट आणि स्लो लोकल येत असल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ आहे, दुपारनंतर जेव्हा ठाणे स्थानकात मुंबईकडे जाणारा स्लो ट्रॅक सुरू होईल तेव्हा यात फरक पडेल.
प्रवास करणाऱ्या आणि कामावर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत मात्र त्यासोबतच रेल्वे प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत असंख्य प्रवाशांनी कामावर जाणे टाळले आहे, त्यामुळे नेहमीपेक्षा प्रवासी संख्या घटल्याचं दिसून येत आहे. रस्त्यावरील वाहतुकी मध्येही मोठी वाढ झाल्याने रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी बघायला मिळते आहे.
ML/ML/SL
31 May 2024