२२ जानेवारीला केंद्रीय कार्यालयांना अर्धा दिवस, तर ५ राज्यांत पूर्ण दिवस सुट्टी

नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येतील श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांना २२ जानेवारी रोजी अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सकाळपासून दुपारी अडीच वाजेपर्यंत शासकीय कार्यालये आणि शाळा-महाविद्यालयांना अर्धा दिवस सुट्टी असेल, असे सांगण्यात आले आहे. यामुळे लोकांना रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम थेट पाहता येईल.याशिवाय 5 राज्यांमध्ये दिवसभर सुट्टी असेल. त्याच वेळी, 7 राज्यांमध्ये मांस आणि दारूची विक्री होणार नाही.
आतापर्यंत 5 राज्यांनी 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यामध्ये यूपी, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि हरियाणा यांचा समावेश आहे. राजस्थान सरकारची पहिली कॅबिनेट बैठक आज म्हणजेच 18 जानेवारीला होणार आहे, ज्यामध्ये 22 जानेवारीला सरकारी सुट्टीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान भाजपशासित राज्यांतील अनेक सरकारांनी २२ जानेवारीच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे निर्णय घेतले आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, आसाम, छत्तीसगड या राज्यांत २२ जानेवारीला ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारनं मांस आणि माशांच्या विक्रीवरही बंदी घातली आहे
SL/KA/SL
18 Jan. 2024