केंद्र सरकारचा ‘Agri Stack’ उपक्रम, जमीन खरेदी विक्रीची माहिती एका क्लिकवर

 केंद्र सरकारचा ‘Agri Stack’ उपक्रम, जमीन खरेदी विक्रीची माहिती एका क्लिकवर

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने ‘ Agri Stack’हा उपक्रम सुरू केला असून याद्वारे सर्व जमीन मालक यांचे आधार नंबर व मोबाईलचा नंबर घेऊन माहिती एकत्रित करण्यात येत आहे. या उपक्रमाने जमीन खरेदी विक्रीची संपूर्ण माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यात २१ जानेवारी २०२५ च्या आदेशान्वये यासाठी विशेष कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे देशात कुणाकडे, कुठे व किती जमीन आहे, याची सर्व माहिती सरकारला मिळणार आहे. त्याचबरोबर अमर्याद जमीन खरेदीवरही नियंत्रण ठेवता येणार आहे.

आधार नंबर व पत्ता, पॅन कार्ड, जमीन मालकी, बँक अकाऊंट, इन्कम टॅक्स, जीएसटी ही सर्व माहिती एकत्र करून कॉम्प्युटर व एआय तंत्रज्ञानच्या मदतीने विश्लेषण करणे सहज शक्य होईल. कमाल जमीन धारणा कायद्याप्रमाणे जमीन घेण्यास मर्यादा आहे. यात जास्तीत जास्त १८ एकर बागायत जमीन घेता येते. जिरायत जमिनीला सुद्धा मर्यादा आहे.

या पेक्षा जास्त जमीन कुणाकडे आहे? त्याचा ही शोध आता सहज घेता येणार आहे. शेतकरी असणाऱ्या व्यक्तीलाच ही जमीन विकत घेता येते. अन्यत्र जमीन असल्याचे भासवून खोटे शेतकरी दाखले देऊन ज्यांनी शेत जमीन खरेदी केली आहे. त्याचा ही शोध लावता येणार आहे.

SL/ML/SL

20 Feb. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *