RBI कडून केंद्र सरकारला मिळणार विक्रमी लाभांश

नवी दिल्ली, दि. २५ : RBI ने २०२५ या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारला २.६९ लाख कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ या आर्थिक वर्षात दिलेल्या २.१ लाख कोटी रुपयांच्या लाभांशापेक्षा खूपच जास्त आहे. या मोठ्या हस्तांतरणामुळे केंद्र सरकारची वित्तीय तूट ४.४ टक्क्यांनी कमी होण्यास मदत होईल.
चालू आर्थिक वर्षात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सरकारने ११.२१ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यासोबतच, २०२६ च्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात कर सवलतीच्या उपाययोजनांचाही समावेश करण्यात आला आहे. या लाभांशामुळे सरकारला त्यांच्या योजना अंमलात आणण्यास आणि वित्तीय तूट नियंत्रित करण्यास मदत होईल.