केंद्र सरकारकडून ELI योजनेला मंजुरी, ३.५ कोटींहून नोकऱ्या होणार उपलब्ध

 केंद्र सरकारकडून ELI योजनेला मंजुरी, ३.५ कोटींहून नोकऱ्या होणार उपलब्ध

नवी दिल्ली, दि. १ : केंद्रीय मंत्रिमंडळाने एम्‍प्‍लाईमेंट लिंक्‍ड इन्सेंटिव्ह योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत सर्व क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती करणं, रोजगार क्षमता वाढवणं आणि सामाजिक सुरक्षा वाढवण्याची तयारी केली जात आहे. सरकारचं या योजनेअंतर्गत 2 वर्षात 3.5 कोटींहून अधिक लोकांना नोकरी देण्याचं लक्ष्य आहे.

त्याचबरोबर सरकार पहिल्यांदाच काम करणाऱ्या कामगारांना दोन हफ्त्यांमध्ये एक महिन्याच्या पगाराच्या समतुल्य 15 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान देईल. या योजनेचा उद्देश उत्पादन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करताना पहिल्यांदाच काम करणाऱ्या कामगारांना प्रोत्साहन देणे आहे. यासोबतच, देशातील बेरोजगारी कमी करणे हे उद्दिष्ट आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या योजनेबद्दल सविस्तर माहिती देताना सांगितलं की, ही योजना दोन वर्षांत 3.5 कोटींहून अधिक रोजगार निर्मितीला पाठिंबा देण्यासाठी तयार करण्यात आली आहे आणि त्यासाठी 1 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. सर्वांशी चर्चा करून ही योजना तयार करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पादरम्यान या योजनेची घोषणा केली होती.

उत्पादन क्षेत्रावर लक्ष केंद्रित असेल असं केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं आहे. त्याचे दोन भाग प्रथम आणि शाश्वत रोजगारासाठी केले आहेत. प्रथम काम करणाऱ्यांना नोकरी शोधण्यात अनेक अडचणी येतात. म्हणून, प्रथम काम करणाऱ्यांसाठी अनुदान मंजूर करण्यात आले आहे, ज्यामध्ये जास्तीत जास्त 15 हजार रुपये दिले जातील. हे दोन हप्त्यांमध्ये दिले जाईल. एक सहा महिन्यांसाठी आणि दुसरा १२ महिन्यांसाठी. या अनुदानाचा लाभ कंपन्यांना दिला जाईल. दुसरे म्हणजे, जर आपण शाश्वत रोजगार दिला तर याअंतर्गत, प्रत्येक कर्मचाऱ्याला २ वर्षांसाठी दरमहा 3000 रुपयांचे सहाय्य दिले जाईल. यामुळे रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील. यामुळे शाश्वत विकासाला चालना मिळेल.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *