केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची परीक्षा आता १३ भारतीय भाषांमध्ये

 केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची परीक्षा आता १३ भारतीय भाषांमध्ये

नवी दिल्ली, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CAPF) कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी प्रथमच कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षा हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जणार आहे. 20 फेब्रुवारी ते 7 मार्च 2024 या कालावधीत देशभरातील 128 शहरांमधील सुमारे 48 लाख उमेदवारांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तसेच केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली, गृह मंत्रालयाने 01 जानेवारी 2024 पासून हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात स्थानिक तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या पुढाकाराने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.

कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आता हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त आसामी, बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगू, ओडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी आणि कोकणी भाषेत तयार केल्या जातील. कॉन्स्टेबल (GD) निवड परीक्षा ही कर्मचारी निवड आयोग (SSC) द्वारे घेतल्या जाणाऱ्या प्रमुख परीक्षांपैकी एक असून देशभरातील लाखो तरुण ही परिक्षा देण्यासाठी उत्सुक असतात.

या ऐतिहासिक निर्णयामुळे देशभरातील लाखो तरुणांना त्यांची मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषेत ही परीक्षा देता येईल, यामुळे त्यांची निवड होण्याची शक्यताही वाढेल.
केंद्र सरकारच्या या उपक्रमामुळे देशभरातील तरुणांना त्यांच्या मातृभाषेत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षेत सहभागी होऊन राष्ट्रसेवेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.Central Armed Police Force Exam Now in 13 Indian Languages

ML/KA/PGB
11 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *