शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी केंद्राचा आग्रह, सिद्दीकींच्या हत्येनंतर केंद्रीय यंत्रणा अलर्ट

 शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी केंद्राचा आग्रह, सिद्दीकींच्या हत्येनंतर केंद्रीय यंत्रणा अलर्ट

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची वांद्रे पूर्व इथं काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली होती. या हत्येची जबाबदारी सोशल मिडिया पोस्टवरुन बिश्नोई टोळीने स्विकारली. या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.विधानसभा निवडणुकांच्या आधी घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे आता देशातील केंद्रीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. महाराष्ट्रात काही दिवसात विधानसभा निवडणूका होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय यंत्रणांनी सुरक्षा आढावा घेतला. दरम्यान, आता खासदार शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याबाबत पुन्हा एक विनंती करण्यात येणार आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *