इयत्ता पाचवी ते आठवी इयत्तांसाठीचे सरसकट उत्तीर्ण धोरण रद्द
नवी दिल्ली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही वर्षांपासून मोठ्या टिकेचा सामना करावे लागलेले पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट वरच्या वर्गात ढकलण्याचे धोरण अखेर आज केंद्रीय शिक्षण मंडळाकडून रद्द करण्यात आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने इयत्ता पाचवी ते आठवीसाठी सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द केलं आहे. हे धोरण सुरुवातीला प्रचंड टीकेचा विषय ठरला होता. त्यामुळे आता अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी पुढच्या वर्गात जाऊ शकणार नाहीत. त्यांना दोन महिन्यांच्या आत परीक्षा देऊन पुढच्या वर्गात जाण्याची तरतूद करण्यात आली आहे.
शिक्षण हक्क कायद्यात २०१९ च्या दुरुस्तीनंतर १६ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांनी दोन वर्गांसाठी नो डिटेंशन पॉलिसी आधीच काढून टाकली होती. नवीन धोरणानुसार, जे विद्यार्थी नियमित परीक्षांनंतर पदोन्नतीचे निकष पूर्ण करू शकत नाहीत, त्यांना अतिरिक्त संधी दिली जाईल. निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यांत पुनर्परीक्षा आयोजित केली जाईल. उत्तीर्ण होण्याकरता ही एक संधी असेल.
SL/ML/SL
23 Dec. 2024