OTT वरील चित्रपट आणि वेब सिरिजसाठी केंद्राकडून नवीन नियम लागू
मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज जागतीक तंबाखू विरोधी दिन आहे, या निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ओटीटी प्लॅटफॉर्मवर तंबाखूविरोधी इशाऱ्यांसाठी नवीन नियमांची अधिसूचना जारी केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार, OTT प्लॅटफॉर्मला कंटेंटमध्ये तंबाखूविरोधी चेतावणी संदेश प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अधिसूचनेत असे म्हटले आहे की जर ऑनलाइन कंटेंट प्रकाशक नवीन नियमांचे पालन करण्यात अयशस्वी झाले तर केंद्रीय आरोग्य आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय त्यांच्यावर कठोर कारवाई करेल.
चित्रपटगृहे आणि टीव्हीवर धूम्रपानाचे दृश्य दाखवण्यासोबतच तळाशी छोट्या अक्षरात लिहिलेला इशारा तुम्ही अनेकदा पाहिला असेल, टीव्ही आणि थिएटरमध्ये कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी किमान 30 सेकंदांसाठी तंबाखूविरोधी चेतावणी जारी केली जाते, परंतु OTT साठी हा नियम बंधनकारक नव्हता. मात्र आता हा नियम Hotstar, Amazon Prime, Sony Liv, Netflix, Zee5 सारख्या OTT प्लॅटफॉर्मवरही सक्तीने लागू करण्यात आला आहे.
पीएफआयच्या फुलवारी शरीफ प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बिहार, कर्नाटक आणि केरळमधील सुमारे २५ ठिकाणी छापे टाकले आहेत. एनआयएच्या पथकाने कटिहारच्या हसनगंज पोलीस स्टेशन अंतर्गत मुझफ्फर टोला येथे सुमारे ३ तास कारवाई केली. यावेळी एनआयएच्या पथकाने नासिर हुसैन यांच्या घरातील अनेक कागदपत्रांची झडती घेतली.
त्याचवेळी, स्थानिक लोकांच्या मते, एनआयएने मेहबूब आलम नदवीचा भाऊ मोहम्मद जावेद याला चौकशीसाठी सोबत घेतले आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. जुलै २०२२ मध्ये, पीएफआयशी संबंधित काही लोक फुलवारीशरीफ, पाटणा येथे पोलिसांनी छाप्यात पकडले होते.
छाप्यात इंडिया २०४७ नावाचा ७ पानी दस्तावेजही सापडला आहे. यामध्ये येत्या २५ वर्षात भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याची योजना आखण्यात आली होती. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मुस्लिम तरुणांना शस्त्रास्त्र प्रशिक्षण दिले जात होते. त्यावेळी ६ जणांना अटक करण्यात आली होती.
SL/KA/SL
31 May 2023