मंडप उभारून परीक्षा घेतल्याने केंद्र प्रमुख निलंबीत
बीड, दि. २३ : मंडप उभारून १० वीची परीक्षा घेणं बीडमधील केंद्रप्रमुखांना चांगलं भोवल आहे. शिक्षण विभागानं केंद्रप्रमुखांचं निलंबन केल आहे. कुर्ला या ठिकाणी यशवंत विद्यालयात जागे अभावी आणि अचानक विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे कारण देत केंद्रप्रमुखानं थेट शाळेच्या टेरेसवर मंडप उभारून विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर शिक्षण विभागाने कारवाईचे आदेश दिले. याची अंमलबजावणी करत संस्था चालकाने केंद्रप्रमुख अभिषेक राऊत यांना हटवून त्यांच्या जागी ज्ञानोबा डोंगरदिवे यांची नियुक्ती केली आहे.
अनेक वर्षांपासून शाळेच्या वरंड्यात बसून विद्यार्थी पेपर द्यायचे. मात्र यावर्षी विद्यार्थी संख्या वाढली आणि त्यामुळे हा प्रकार घडल्याचं केंद्रप्रमुखांनी मान्य केलं. आता जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था केल्याचे म्हणत या प्रकारावर शाळा प्रशासनाने सावरा सावर केली होती.
SL/ML/SL