कृषिक्षेत्रासाठी १४ हजार कोटी रुपये खर्चास केंद्राची मंजुरी
नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने आज कृषिक्षेत्रासाठी एकूण १४ हजार कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे. यामध्ये पीक विज्ञान आणि डिजीटल कृषी मिशन योजनांचाही समावेश आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
असा होणार निधीचा विनियोग
- डिजिटल कृषी मिशनसाठी 2,817 कोटी रुपये
- पीक विज्ञानसाठी 3,979 कोटी रुपये
- कृषी शिक्षण आणि व्यवस्थापनाच्या बळकटीसाठी 2,291 कोटी रुपये
- शाश्वत पशुधन आरोग्य आणि उत्पादनासाठी 1,702 कोटी रुपये
- फलोत्पादनाचा शाश्वत विकास करण्यासाठी 860 कोटी रुपये
- कृषी विज्ञान केंद्राचे बळकटीकरणासाठी 1,202 कोटी रुपये
- नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन करण्यासाठी 1,115 कोटी रुपये
अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाने अन्न आणि पोषण या पीक विज्ञानासाठी ३ हजार ९७९ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली आहे. याशिवाय, फलोत्पादन क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी 860 कोटी रुपयांच्या आणखी एका योजनेलाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे, असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. वैष्णव यांनी पुढे सांगितलं की, मंत्रिमंडळाने कृषी विज्ञान केंद्रांसाठी 1202 कोटी रुपये आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी 1115 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे.
SL/ML/SL